शुक्रवार, ११ जानेवारी, २०१९

परीपाठ- 11/01/2019

*11/01/19 शुक्रवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━

*❁ दिनांक :~ 11/01/2019 ❁*
      *🔘 वार ~ शुक्रवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

    🔗🔗👇👇🔗🔗

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*

🍥 *11. जानेवारी:: शुक्रवार* 🍥
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
              पौष शु. ५
     तिथी : शुक्ल पक्ष पंचमी,
           नक्षत्र : शतभिषा,
   योग : व्यतिपात,  करण : बव,
सूर्योदय : 07:14, सूर्यास्त : 18:18,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

11. *परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

11. *टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही*   
       *★अर्थ ::~*
- कष्टाशिवाय मोठेपणा येत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

11. *शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।*
   ⭐अर्थ ::~ शरीर हे धर्माचरणाचे प्रथम साधन आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

  🛡 *★11. जानेवारी ★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील अकरावा दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : छत्तीसगड उच्‍च न्यायालयाची स्थापना
●१९९९ : ’कमाल जमीनधारणा कायदा’ रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी
●१९७२ : पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.
●१९६६ : गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
●१७८७ : विल्यम हर्षेल याने ’टिटानिया’ या युरेनसच्या सर्वात मोठ्या चंद्राचा शोध लावला. त्याच दिवशी त्याने ’ओबेरॉन’ या युरेनसच्या दुसर्‍या मोठ्या चंद्राचाही शोध लावला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५५ : आशा खाडिलकर – उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका
◆१९४४ : शिबू सोरेन – झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री आणि खासदार
◆१८५९ : लॉर्ड कर्झन – ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय
◆१८५८ : श्रीधर पाठक – हिन्दी कवी, लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिन्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : य. दि. फडके – लेखक व इतिहाससंशोधक
●१९९७ : भबतोष दत्ता – अर्थतज्ञ
१९८३ : घनश्यामदास बिर्ला – उद्योगपती व शिक्षण महर्षी
●१९६६ : स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले. त्यांना मरणोत्तर ’भारतरत्‍न’  सन्मानाने गौरविण्यात आले होते.
●१९५४ : सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या ’सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

11.      *✸ भारत माझा ✸*
       ●●●●●००००००●●●●● 
भारत सुंदर माझा,
स्वप्नातल्या स्वर्गापरी,
अभिमान मज त्याचा,
जन्मलो मी या भूवरी।

      भेदभाव ना कोणता,
      धर्म,पंथ विविधता,
      एकोप्याचा वाहे झरा,
      सर्वधर्म सहिष्णूता।

भारत माझा हा देश,
पाईक मी हो त्याचा,
राष्ट्रभक्ती हृदयी माझ्या,
राखे मान तिरंग्याचा।

      जगात सुंदर देश,
      हा माझा आहे भारत,
      संस्कृतीने भारताच्या,
      जग सारे प्रभावित ।
                  *~ अर्चना वासेकर*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थणा ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

11. *❂ अविरत पुढे पुढे जाऊ ❂*
        ✶✶✹✹★●★✹✹✶✶
अविरत पुढे पुढे जाऊ
अम्हि ना विश्रांति आता घेऊ॥धृ॥

उध्दराया पूर्वज शापित घोर आचरुनि तप हे अविरत
मुक्ति मिळवुनी देइ भगीरथ सातत्याने भगीरथाच्या
पुढे पुढे जाऊ॥१॥

शांत सागरी सेतू बांधून नष्ट कराया संकट दारूण
जाई वानरासह रघुनंदन त्या धैर्याने रघुरायच्या
पुढे पुढे जाऊ॥२॥

स्वर्गी तो देवेन्द्र कोपला गारायुत पर्जन्य वर्षला
गोवर्धन गोपांनि उचलला चातुर्याने श्रीकृष्णाच्या
पुढे पुढे जाऊ॥३॥

धुमाकुळ यवनांचा चाले आवर घाली शिवराय बळे
घेवुनि संगे मित्र मावळे त्या शिवराया साक्ष ठेवुनी
पुढे पुढे जाऊ॥४॥

सातत्याच्या अन् धैर्याच्या चातुर्याच्या संघटनेच्या
मातृभूमिच्या उध्दाराच्या महाजनांच्या त्याच पथाने
पुढे पुढे जाऊ॥५॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

11.     *❃❝ शिंपले ❞❃*
     ━━═•●◆●★●◆●•═━━
     एकदा आतले मांस काढून घेतलेला एक मोठा शिंपला समुद्रकिनाच्यावर पडला होता. तो सूर्यप्रकाशात चकाकत होता. तो शिंपला पाहून एक लहान शिंपला तेजस्वी नि सुंदर आहे, पाहिलास का ? सौंदर्यात व चकचकीतपणात याची बरोबरी समुद्रात दुसरा कोणीही करू शकणार नाही. आई, मी याच्याइतका मोठा होऊन याच्यासारखं दिसायला अजून किती वर्ष लागतील कोण जाणे !' इतकी वर्ष वाट पाहता पाहता मी अगदी कंटाळून जाईन. त्यावर त्याची आई म्हणाली, 'अरे वेडया पोरा ! ह्या शिंपल्याची अशी स्थिती होण्यास त्याचं सौंदर्यच कारण झालं आहे, हे लक्षात आहे ना ? तू जर ह्याच्यासारखा लठ्ठ होऊन चकाकू लागशील तर तुझं मांस खाण्यासाठी लोक तुला मारून टाकतील. तेव्हा जो मोठेपणा तुझ्या नाशाला कारण होईल त्याची अपेक्षा तू कशाला करतोस ?'

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
          लहानपण दे गा देवा ।
      न चले कोणाचाही हेवा ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

11. *कागदाला पीन मारली कि कागद एकत्र होतात..*
  *आणि माणसाला पीन मारली कि माणसं वेगळे होतात..*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

11. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ इजिप्त देशाची राजधानी :
Ans :   *कैरो*

■ जगातील पहिला अंतराळवीर कोण?
Ans :   *युरी गागारीन*

■ केलेले उपकार  जाणणारा-
Ans :   *कृतघ्न*

■ काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह कोणी केला?
Ans :   *डॉ. बि. आर. आंबेडकर*

■ मानवाच्या शरीरामध्ये सामान्यत:कॉंब्रोहाड्रेड किती टक्के?
Ans :   *0.015*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

11. *❒ लाल बहादूर शास्त्री ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
  स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान,
*”जय जवान जय किसान”* हा मंत्र देणारे, मरणोत्तर ’भारतरत्‍न’  सन्मानाने गौरविण्यात आलेले.
   अशा या महान नेत्यास त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.!!
      🙏🌲🙏🌹🙏🌲🙏

●जन्म :~ २ आक्टोबर १९०४
*●मृत्यू :~ ११ जानेवारी १९६६*

           भारत देशाला 
*”जय जवान जय किसान”* हा मंत्र देणाऱ्या लाल बहादूर शास्त्रीचा जन्म  उत्तर प्रदेशातील मुगलसराई या गावी झाला. त्यांचे आडनाव श्रीवास्तव होते पण शास्त्री झाले. त्यांना जन्मत: वैभव लाभले नाही. त्यांच्या जन्मा नंतर लवकरच त्याच्या वडिलांचे देहांत झाले. त्यामुळे त्यांच्या आईने माहेरी जावून त्यांचे संगोपन केले. त्यांचे बालपण आजोळी मामाच्या आश्रयात झाले.

      महात्मा गांधी  यांचा जन्म व शास्त्री जीचा चा जन्म एकाच तारखेला येतो.  त्यांचे विचारहि एकच होते. महात्मा गांधी जींच्या विचारांचा जबरदस्त पगडा शास्त्री जींच्या मनावर होता. शास्त्री जेवढे मृदू होते तेवढे निश्चयी होते. महात्मा गांधींचे पहिले दर्शन त्यांना १९१६ साली झाले. त्यावेळी ते आफ्रिकेत सत्याग्रह करून नुकतेच भारतात आले होते. तेव्हा पांढरा काठेवाडी फेटा, अंगरखा व जोडा सर्वांच्या नजरेत भरेल असा  त्यांचा पेहराव होता. साधा पेहरावां खाली दडलेल्या विचारांची श्रीमंती त्यांच्या भाषणा वरून दिसून आली. राजे महाराजाच्या समोर केलेल्या भाषणात गांधी म्हणाले होते, ‘ 
     भारतातील जनता दालीद्र्यात मरत असताना एवढे अलंकार चढवून राजे महाराजे येथे आलेत. त्यांनीअगोदर आपले जडजवाहीर विकून टाकावे व मिळालेला पैसा गोरगरिबांना वाटावा.’ महाराजांच्या श्रीमंतीची घानाघात  करणारे शब्द ऐकून अनेक राजे भर सभेतून उठून गेले. पण सभा एकण्यासाठी आलेली  जनता गांधीजींच्या या भाषणाने टाळ्या वाजवून यथोचित सन्मान केला. हे दृश्य शास्त्रीजींनी पाहिले. व ते देश प्रेमाने प्रेरित झाले. त्यांचे मन अभ्यासात लागे ना तेव्हा त्यांनी शाळेला राम राम ठोकला व ते स्वातंत्र्याच्या चळवळीत सामील झाले. पण त्या नंतर ते पुन्हा शिक्षणाकडे वळले. त्यांना ज्ञान सम्पाद्नाची विशेष हौस होती कॉलेजला जाण्यासाठी त्यांना रोज ५ ते १० मैलाची पायपीट करावी लागायची. कॉलेज  झाल्या नंतर त्यांचा एक निश्चय होता कि नोकरी न करता समाजसेवा करायची. त्या वेळी लाला लजपतरायांनी गोखल्यांच्या धर्तीवर ‘लोकसेवक समाज’ संस्था काढली व त्या द्वारे शास्त्रीजींनी  अस्पृश्योध्दाराचे काम सुरु केले. स्त्रियांची स्वतंत्रता आणि स्वदेशी हि त्यांची व्रते होती. १९२७ साली ललितादेवी यांचेशी त्यांचा विवाह झाला. त्यांचा संसार त्यांनी उत्तम रितीने केला. आपला पती लोकसेवक आहे. त्याकरिता शास्त्रीजीनचा वेळ संसाराच्या व्यापात जावू नये यासाठी त्या दक्षता घेत. ते देशासाठी ठिकठीकाणी जावून आले तिथे तिथे आपल्या मृदू व निश्चयी शब्दांनी ती आपली छाप पाडीत. आणि आपल्या देशात काय उणे आहे दुसर्या देशापासून काय घेण्या सारखे हे  त्या प्रमाणे स्वदेशी परतल्या नंतर ते कामाला लागत. २७ मे १९६४ ला नेहरूजिंचा अंत झाल्या नंतर देशाची सर्वस्वी जबाबदारी लाल बहाद्दूर शास्त्री यांचेवर आली. त्यांनी आपल्या कृतीने माणसाचे शील व निश्चय किती प्रभावशाली असू शकतात हे त्यांनी स्वत:वरून दाखविले. अठरा महिन्याच्या छोट्याशा कारकिर्दीत आपण पंतप्रधान पदाला किती लायक होतो हे शास्त्रींनी आपल्या कृतीने दाखवून दिले. शास्त्रीजी चे संपूर्ण जीवन हीच एक आदर्श आचार संहिता होय. त्यांच्या अंगच्या अनेक गुणांचा प्रत्यय आज पर्यंत अनेक वेळा आला असलातरी या वामन मूर्तीने अनेक धैर्यशाली मार्गदर्शन भारताला केले. त्याने सारे जग स्तिमित झाले आहे. भारताची मान जगात उंचावली.
”जय जवान जय किसान” या शास्त्रीजींच्या नव्या घोषणेत त्यांच्या देश विषयक खंबीर धोरणाचे पडसाद उमटले.”

     लाल बहाद्दूर शास्त्री कॉंग्रेस चे सरचिटणीस असताना त्यांना दरमहा ६० रुपये  पगार होता , जो ते आपल्या पत्नी कडे देत आणि त्या मध्ये त्यांचा सगळा खर्च चालत असे. एकदा त्यांचा एक जवळचा मित्र त्यांच्या कडे आला , त्याच्या मुलाच्या शस्त्रक्रिये साठी त्याला ६० रुपये उसने पहिले होते, त्यांनी शास्त्रीजींकडे ६० रुपये मागितले..., शास्त्रीजी म्हणाले कि माझा पगाराच तेव्हडाच आहे, ज्या मध्ये माझ्या कुटुंबाचा खर्च जमतेम  भागतो मी तुला कुठून पैसे देऊ ? शास्त्रीजींची पत्नी हे ऐकत होती , त्या म्हणाल्या त्याची आजची गरज महत्वाची आहे , माझ्या कडे ६० रुपये आहेत आपण ते त्यांना द्या. शास्त्रीजींनी त्याला पैसे दिले. तो मित्र गेल्यावर त्यांनी आपल्या पत्नीला विचारले कि हे पैसे तू कुठून आणलेस ? त्या म्हणाल्या तुमच्या दर महिन्यातील पगारातून मी ५ रुपये साठवत होते त्याचे १ वर्षाचे असे साठलेले , ६० रुपये माझ्या कडे होते.    ...त्या नंतर लाल बह्हादूर शास्त्री यांनी कॉंग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिले आणि स्वतःचा पगार ५५ रुपये करण्याची विनंती केली....त्यांनी असे लिहिले कि माझा महिन्याचा खर्च ५५ रुपयात भागतो ...!!                                                            
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
     

शुक्रवार, ४ जानेवारी, २०१९

देशातील पहिली स्काय बस औरंगाबादेत धावणार

◾️देशातील पहिली स्काय बस औरंगाबादेत धावणार आहे. स्काय बससाठी वाळूज ते जालना हा 85 कि.मी.चा पायलट प्रयोग राबविला जाणार असून, येत्या 16 जानेवारी रोजी एक ऑस्ट्रेलियन कंपनी स्काय बसचे सादरीकरण करणार असल्याची घोषणा केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (दि.30) येथे केली.

गडकरी हे एका विवाह सोहळ्यासाठी औरंगाबाद शहरात आले होते. विभागीय आयुक्‍त कार्यालयात त्यांनी मराठवाड्यातून जाणार्‍या सर्व राष्ट्रीयमहामार्गांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. विभागीय आयुक्‍त पुरुषोत्तम भापकर,जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह रस्त्यांशी संबंधित सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

वाळूज ते जालना शहर जोडण्यासाठी औरंगाबादमध्ये मेट्रो द्यावी, अशी मागणी आ. अतुल सावे यांनी गडकरी यांच्याकडे केली होती. या मागणीचा उल्लेख करीत त्यांनी या बैठकीत सांगितले की, मेट्रोचा खर्च हा 250 कोटींपर्यंत जातो. मी आस्ट्रेलियात जी स्काय बस पाहिली ती अवघ्या 50 कोटीत होईल. डॉफेल मेअर या ऑस्ट्रेलियन व रॉबॅकस या भारतीय कंपनीचे
अधिकारी औरंगाबादला 16 जानेवारीला येऊन सादरीकरण करणार आहेत. हॉटेल अजंता अ‍ॅम्बेसेडॉर येथे आयोजित केलेल्या जल परिषदेत हे सादरीकरण केले जाईल. ऑस्ट्रेलियन कंपनीने दिलेल्या प्रेझेंटेशन नंतर स्काय बसचा डीपीआर तयार करण्यात येणार आहे.

शनिवार, २९ डिसेंबर, २०१८

👆🇲 🇪 🇬 🇦 🇧 🇭 🇦 🇷 🇹 🇮👆 🎯 पोलीस,सरळसेवा, MPSC प्रवेश सुरू..

नविन बॕचेस- दि. 02 जानेवारी 2019 पासून
📚 MPSC/PSI/STI/ASO/EXCISE/तलाठी/ग्रामसेवक/विस्ताराधिकारी/आरोग्य-कृषीसेवक/ZP-कलेक्टर Office CLERK अशा 50 हून जास्त पदांची संपूर्ण तयारी...
🔖 *_लाईफटाईम बॕचेस उपलब्ध_*
📚 *प्रवेश सुरू...आपले पद पक्के करा. यशाची 💯% हमी.. अगदी नाममात्र शुल्क* 💠
=======================
🔰 *_नविन बॕचेस- दि. 02 जानेवारी 2019 पासून_*
⏲  *_वेळा_* -(स. 7 ते 12./ दु. 2 ते 5 वा./सायं. 5 ते 9 वा.)
🌀 ग्रामीण भागातील मुले व मुलींना  नाममात्र फीस *भव्य 5⃣0⃣% सूट*
======================
🚨 पोलीस भरती बॕच
(लेखी+ग्राउंड)
🏆 महाभरती सरळसेवा बॕच
📕 MPSC(PSI/STI/ASO) फाउंडेशन बॕच
💥 *स्पेशल मराठी व्याकरण , गणित-बुद्धिमत्ता, इंग्रजी ग्रामर बॕचेस सुरू.*
*****************************
🔮 *ग्रामीण भागातील मुलींना पोलीस भरती ग्राउंडचे प्रशिक्षण मोफत देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था.*
📚 दोन दिवस फ्री डेमो लेक्चर्स करा, नंतरच प्रवेश घ्या.
☑ *लगेच संपर्क करा*...👇
🔖 *द स्पर्धाविश्व करिअर अकॕडमी, TV सेंटर पोलीस चौकीसमोर, वरद नेत्रालयाच्या वर , संभाजी चौक, हडको, औरंगाबाद*
📱 *मो. 9673708085, 7977481870*
__________________________🔖 *_अधिक माहितीसाठी Telegram Channel जाॕईन करा._*👇👇
🔰Join us -🌀
👉https://t.me/Marathi_MPSCexam
👉https://t.me/MiAdhikari
👉https://t.me/MPSCspardhavishva
👉https://t.me/Science_MPSC
🔮मेगाभरतीच्या Updates साठी खालील Link follow करा.👇 https://chat.whatsapp.com/EM6M86BfXV43gOJQcKHukP
________________________
👆🏼 *कृपया वाचून📢 समाजातील प्रत्येक सुशिक्षित गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा.*

शनिवार, ८ सप्टेंबर, २०१८

🌀💥✍अधिकारी आपल्या भेटीला✍💥🌀


____________________________
हा नविन उपक्रम आपण सुरू करीत आहोत.
   मित्रांनो,
आपण ग्रामीण भागात अभ्यास करत असाल व तेथे आपल्या विद्यार्थीमित्रांना
✅अभ्यासपद्धती, 
✅योग्य  स्पर्धापरीक्षाविषयक मार्गदर्शन ,
✅सध्याचे करीअरचे विविध मार्ग ,
✅MPSC क्षेत्रातील वास्तव,
✅प्रशासनातील संधी व आव्हाने.
✅मेगाभरतीची तयारी
    अशा अनेक विषयांचा उलगडा करण्यासाठी मी माझ्या या क्षेत्रातील मित्रांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमच्या मनात असलेले समज-गैरसमज,न्युनगंड,दृष्टिकोन याबाबत भाष्य करण्याचा याठिकाणी माझा प्रयत्न राहील. विद्यार्थ्यांच्या विकासात योगदान देणाऱ्या मार्गदर्शन केंद्राच्या संचालकांनासुध्दा याठिकाणी मी उपलब्ध असेल. एक छंद व सामाजिक कार्य म्हणून मला हे करायचे आहे.नोकरी सांभाळून हा उपक्रम राबवायचा असल्याने मी शनिवार व रविवार याच दिवशी वेळ देऊ शकेल. यात माझे काही ध्येयवेडे अधिकारी व लेखक मित्र यांनाही मी सोबत घेणार आहे.
कृपया, आपण इच्छुक असल्यास खालील नं. वर संपर्क करावा.
✍आपला..
रोहिदास चोंधे-पाटील
(राज्यकर निरीक्षक, औरंगाबाद)
📲 9673708085

💠Join us on Telegram channel 💠
@MPSCspardhavishva
@Miadhikari
@Science_MPSC
@MPSCoverview
भेट द्या.👇
www.mpscspardhavishva.blogspot.com

शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१८

💠 🔅नॅशनल मिशन ऑन गव्हरमेंट ई-मार्केटला (जीआयएम)🔅💠

मुख्य केंद्रीय मंत्रालयांना, राज्य सरकारे आणि त्यांच्या एजन्सींनी दत्तक आणि जीईएमचा वापर वाढवण्यासाठी 5 सप्टेंबर 2018 रोजी नॅशनल मिशन ऑन गव्हरमेंट ई-मार्केटला (जीआयएम) लॉन्च केले .

✳️उद्दिष्ट✳️
✍सार्वजनिक उत्पन्नातील सर्वसमावेशकता, पारदर्शकता आणि कार्यक्षमतांचा प्रचार करणे आणि नगदमुक्त, संपर्करहित आणि कागदरहित व्यवहार प्राप्त करणे हा या मिशनचा मुख्य हेतू आहे.

🛑प्रमुख वैशिष्ट्ये🛑

6 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2018 दरम्यान सहा आठवड्यांच्या विशेष मोहिमेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी संबंधित राज्य मुख्यालयांमधून ही मोहीम सुरू केली जाईल.

🔮हे महत्त्वाचे क्षेत्र आणि फ्लॅगशिप प्रोग्रॅम, आयईसी मोहिमेचे प्रक्षेपण, क्रेता आणि विक्रेत्यांसाठी गीमचा वापर करण्यासह प्रशिक्षणासह, एमएसएमईवर विशेष भर असलेल्या शासकीय एजन्सीज आणि विक्रेता नोंदणी मोहिमेवरील खरेदीदार नोंदणी मोहिमेचा समावेश करेल.

🔮त्याच्या अंमलबजावणीमुळे एकुण कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल आणि खरेदीच्या खर्चावर सरकारी खर्चावर बचत होईल.
http://t.me/MPSCoverview

बुधवार, ५ सप्टेंबर, २०१८

💠डॉ. आरिफ अलवी पाकिस्तानचे नवे राष्ट्राध्यक्ष💠


🔅तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) डॉ आरिफ अलवी यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे
🌀पाकिस्तानला नवे राष्ट्राध्यक्ष मिळाले आहेत. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) डॉ आरिफ अलवी यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
🔶विशेष म्हणजे पाकिस्तानच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच भारताशी आणि खास म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याशी कनेक्शन आहे.
🔶डॉ आरिफ अलवी यांचे वडील डॉ हबीब उर रेहमान इलाही अलवी एक डेन्टिस्ट होते. डॉ आरिफ अलवी यांच्या आत्मचरित्रात असलेल्या उल्लेखानुसार त्यांचे वडील पंडित जवाहरलाल नेहरु यांचे वैयक्तिक डेन्टिस्ट होते. पीटीआयच्या वेबसाइटवर डॉ आरिफ अलवी यांचे आत्मचरित्र उपलब्ध आहे. अ
🔷लवी कुटुंबाकडे जवाहरलाल नेहरु यांनी डॉ हबीब यांना लिहिलेली पत्रंही उपलब्ध आहेत.

‘डॉ आरिफ अलवी यांचे वडील डॉ हबीब उर रेहमान इलाही अलवी यांनी भारतात डेन्टिस्ट म्हणून प्रॅक्टिस केली. १९४७ ला फाळणीनंतर ते पाकिस्तानात आले. कराचीमधील सद्दार येथे त्यांनी आपली प्रॅक्टिस सुरु ठेवली. डॉ हबीब जवाहरलाल नेहरुंचे डेन्टिस्ट होते. डॉ हबीब अलवी यांना नेहरुंनी लिहिलेली पत्रं त्यांच्या कुटुंबाकडे आहेत’, अशी माहिती पीटीआयच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

💠Join us💠
@MPSCspardhavishva
@Miadhikari
@Science_MPSC
भेट द्या.👇
www.mpscspardhavishva.blogspot.com

रविवार, २ सप्टेंबर, २०१८

💠3 री 'हिंदी महासागर परिषद'🔮

💠3 री 'हिंदी महासागर परिषद'🔮

★आवृत्ती - 3 री

★स्थळ - हॅनोई , व्हिएतनाम

★ 27, 28 ऑगस्ट 2018 दरम्यान पार पडणार.

★उदघाटन - 'परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज' व व्हिएतनाम उप- पंतप्रधान व परराष्ट्रमंत्री  'फाम बिन्ह मिन' यांच्या हस्ते

★सहभागी देश - 35

शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

📚 महाराष्ट्र जनगणना (अंतिम आकडेवारी ) 🔹 भाग -१ 🔸

By रोहिदास चोंधे-पाटील(STI)

✍ लोकसंख्या :-११,२३,७४,३३३

✍देशाच्या ९.२८% लोकसंख्या महाराष्ट्रात राहते.

✍महाराष्ट्राचा देशात "दुसरा क्रमांक " लागतो.
    - १)उत्तरप्रदेश  २)महाराष्ट्र  ३)बिहार

✍सर्वाधिक लोकसंख्येचे जिल्हे

१) पूणे  (८.३९%) 
२)मुंबई उपनगर (८.३०%)
३)ठाणे (७.१८%)
४)नाशिक
५)नागपूर

✍ सर्वात कमी लोकसंख्येचे जिल्हे

१)सिंधुदुर्ग (०.८%)
२)गडचिरोली
३)हिंगोली
४)वाशिम
५)भंडारा

              🔹 घनता 🔸

        महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता दर चौ.कि.मी ला ३६५ आहे. तर भारताची घनता दर चौ.कि.मी ला ३८२ आहे.

✍सर्वाधिक घनतेचे जिल्हे

१)मुंबई उपनगर -२०९८०
२)मुंबई शहर- १९६५२
३)ठाणे- १९००
४)पूणे - ६०३
५)कोल्हापूर - ५०४

✍ सर्वात कमी घनतेचे जिल्हे

१)गडचिरोली -७४
२)सिंधुदुर्ग -१६३
३)चंद्रपूर -१९३
४)रत्नागिरी -१९७
५)यवतमाळ-२०४

        🔹 लिंग-गुणोत्तर 🔸
   
              महाराष्ट्राचे लिंग- गुणोत्तर ९२९:१००० आहे तर भारताचे लिंग-गुणोत्तर ९४३:१००० आहे.

✍लिंग -गुणोत्तरामध्ये महाराष्ट्राचा बाविसावा(२२ वा) क्रमांक लागतो.

✍ सर्वाधिक लिंग -गुणोत्तराचे जिल्हे

१)रत्नागिरी -११२२
२)सिंधुदुर्ग -१०३६
३)गोंदिया -९९९
४)सातारा -९८८
५)भंडारा -९८२
    गडचिरोली -९८२

✍ सर्वात कमी लिंग -गुणोत्तराचे जिल्हे

१)मुंबई शहर-८३२
२)मुंबई उपनगर -८६०
३)ठाणे -८९१
४)पूणे -९१५
५)बीड-९१६

========================

🌀 आशियाई स्पर्धा 🌀

By- रोहिदास चोंधे-पाटील(STI)
📌आशियाई स्पर्धा अथवा एशियाड ही दर चार वर्षांनी आशियामधील देशांदरम्यान भरवली जाणारी एक बहु-क्रीडा स्पर्धा आहे.

📌ह्या स्पर्धेचे आयोजन आशिया ऑलिंपिक समिती ही आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची एक पाल्य संस्था करते. 

📌ऑलिंपिक खेळांखालोखाल एशियाड ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे.

📌 सर्वप्रथम आशियाई स्पर्धा भारताची राजधानी नवी दिल्ली येथे १९५१ साली खेळवली गेली.

📌आजवर नऊ देशांनी ह्या स्पर्धेचे आयोजन केले आहे व एकूण ४६ देशांनी आपले खेळाडू पाठवले आहेत परंतु १९७४ मधील स्पर्धेनंतर इस्रायलवर सहभाग बंदी घालण्यात आली.

📌 सध्या आशियामधील सर्व ४५ देश ह्या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. आशियातील प्रत्येक देशाची ऑलिंपिक संघटना आपल्या देशातील खेळाडूंची निवड करून या स्पर्धेसाठी पाठविते.

📌 या स्पर्धेतील सर्व खेळांसाठी अनुक्रमे सुवर्णपदक, रजतपदक आणि कांस्यपदक अशी तीन पदके दिली जातात.