शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

🌀 आशियाई स्पर्धा 🌀

By- रोहिदास चोंधे-पाटील(STI)
📌आशियाई स्पर्धा अथवा एशियाड ही दर चार वर्षांनी आशियामधील देशांदरम्यान भरवली जाणारी एक बहु-क्रीडा स्पर्धा आहे.

📌ह्या स्पर्धेचे आयोजन आशिया ऑलिंपिक समिती ही आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची एक पाल्य संस्था करते. 

📌ऑलिंपिक खेळांखालोखाल एशियाड ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे.

📌 सर्वप्रथम आशियाई स्पर्धा भारताची राजधानी नवी दिल्ली येथे १९५१ साली खेळवली गेली.

📌आजवर नऊ देशांनी ह्या स्पर्धेचे आयोजन केले आहे व एकूण ४६ देशांनी आपले खेळाडू पाठवले आहेत परंतु १९७४ मधील स्पर्धेनंतर इस्रायलवर सहभाग बंदी घालण्यात आली.

📌 सध्या आशियामधील सर्व ४५ देश ह्या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. आशियातील प्रत्येक देशाची ऑलिंपिक संघटना आपल्या देशातील खेळाडूंची निवड करून या स्पर्धेसाठी पाठविते.

📌 या स्पर्धेतील सर्व खेळांसाठी अनुक्रमे सुवर्णपदक, रजतपदक आणि कांस्यपदक अशी तीन पदके दिली जातात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा