बुधवार, ५ सप्टेंबर, २०१८

💠डॉ. आरिफ अलवी पाकिस्तानचे नवे राष्ट्राध्यक्ष💠


🔅तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) डॉ आरिफ अलवी यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे
🌀पाकिस्तानला नवे राष्ट्राध्यक्ष मिळाले आहेत. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) डॉ आरिफ अलवी यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
🔶विशेष म्हणजे पाकिस्तानच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच भारताशी आणि खास म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याशी कनेक्शन आहे.
🔶डॉ आरिफ अलवी यांचे वडील डॉ हबीब उर रेहमान इलाही अलवी एक डेन्टिस्ट होते. डॉ आरिफ अलवी यांच्या आत्मचरित्रात असलेल्या उल्लेखानुसार त्यांचे वडील पंडित जवाहरलाल नेहरु यांचे वैयक्तिक डेन्टिस्ट होते. पीटीआयच्या वेबसाइटवर डॉ आरिफ अलवी यांचे आत्मचरित्र उपलब्ध आहे. अ
🔷लवी कुटुंबाकडे जवाहरलाल नेहरु यांनी डॉ हबीब यांना लिहिलेली पत्रंही उपलब्ध आहेत.

‘डॉ आरिफ अलवी यांचे वडील डॉ हबीब उर रेहमान इलाही अलवी यांनी भारतात डेन्टिस्ट म्हणून प्रॅक्टिस केली. १९४७ ला फाळणीनंतर ते पाकिस्तानात आले. कराचीमधील सद्दार येथे त्यांनी आपली प्रॅक्टिस सुरु ठेवली. डॉ हबीब जवाहरलाल नेहरुंचे डेन्टिस्ट होते. डॉ हबीब अलवी यांना नेहरुंनी लिहिलेली पत्रं त्यांच्या कुटुंबाकडे आहेत’, अशी माहिती पीटीआयच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

💠Join us💠
@MPSCspardhavishva
@Miadhikari
@Science_MPSC
भेट द्या.👇
www.mpscspardhavishva.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा