◾️देशातील पहिली स्काय बस औरंगाबादेत धावणार आहे. स्काय बससाठी वाळूज ते जालना हा 85 कि.मी.चा पायलट प्रयोग राबविला जाणार असून, येत्या 16 जानेवारी रोजी एक ऑस्ट्रेलियन कंपनी स्काय बसचे सादरीकरण करणार असल्याची घोषणा केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (दि.30) येथे केली.
गडकरी हे एका विवाह सोहळ्यासाठी औरंगाबाद शहरात आले होते. विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी मराठवाड्यातून जाणार्या सर्व राष्ट्रीयमहामार्गांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर,जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह रस्त्यांशी संबंधित सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
वाळूज ते जालना शहर जोडण्यासाठी औरंगाबादमध्ये मेट्रो द्यावी, अशी मागणी आ. अतुल सावे यांनी गडकरी यांच्याकडे केली होती. या मागणीचा उल्लेख करीत त्यांनी या बैठकीत सांगितले की, मेट्रोचा खर्च हा 250 कोटींपर्यंत जातो. मी आस्ट्रेलियात जी स्काय बस पाहिली ती अवघ्या 50 कोटीत होईल. डॉफेल मेअर या ऑस्ट्रेलियन व रॉबॅकस या भारतीय कंपनीचे
अधिकारी औरंगाबादला 16 जानेवारीला येऊन सादरीकरण करणार आहेत. हॉटेल अजंता अॅम्बेसेडॉर येथे आयोजित केलेल्या जल परिषदेत हे सादरीकरण केले जाईल. ऑस्ट्रेलियन कंपनीने दिलेल्या प्रेझेंटेशन नंतर स्काय बसचा डीपीआर तयार करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा