शनिवार, २७ जून, २०२०

📚 चालू घडामोडी (27/06/2020)*📚


Join https://t.me/MpscSpardhaVishva
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🛑 *भारताचा जीडीपी दोन वर्ष फक्त एक टक्क्यांनी वाढणार – IMF

◆ भारताचा जीडीपी दोन वर्ष फक्त एक टक्क्यांनी वाढणार असं वक्तव्य आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी केलं आहे. 

◆ एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

◆ भारताच्या अर्थव्यवस्थेला अनपेक्षित असा फटका बसला आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था दोन वर्षे धीम्या गतीने प्रगती करेल तसंच भारताचा जीडीपी पुढची दोन वर्षे अवघा एक टक्क्याने वाढेल असं त्यांनी म्हटलं आहे.

◆ सध्याच्या करोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात करोनाच्या चाचण्या वाढवल्या पाहिजेत असाही एक सल्ला गीता गोपीनाथ यांनी दिला आहे.

◆ एवढंच नाही तर अर्थव्यवस्थेत सुधारणा आणायच्या असतील तर लघू आणि मध्यम उद्योग करणाऱ्यांना आणखी आर्थिक उभारी द्यावी लागेल असंही त्यांनी सुचवलं आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🛑 *खादी व ग्रामोद्योग आयोगाकडून संपदेतून कमाईसाठी चंदन आणि बांबू लागवड उपक्रमाची सुरुवात

◆ खादी व ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) आपल्या संपदेतून कमाई करण्यासाठी प्रथमच चंदन आणि बांबू लागवडीचा उपक्रमाची सुरुवात केली आहे.

◆ चंदन आणि बांबूच्या व्यवसायिक वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने KVICने 262 एकर भूखंडावर त्याच्या नाशिक इथल्या प्रशिक्षण केंद्रामध्ये चंदन आणि बांबूची प्रत्येकी 500 रोपे लावून या मोहिमेचा शुभारंभ केला. 

◆ KVICचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांच्या हस्ते 24 जून 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला.

★ ठळक बाबी

◆ KVICने उत्तरप्रदेश राज्यंमधील कनौज इथल्या सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा घटक असलेल्या ‘सुगंध व स्वाद विकास केंद्र’ मधून चंदनाची रोपे तर आसाममधून बांबूची रोपे आणली आहेत.

◆ KVICने मालमत्ता निर्माण करण्याच्या उद्देशाने चंदन वृक्षांच्या लागवडीचे नियोजन केले आहे. कारण आगामी 10 ते 15 वर्षात चंदन लागवडीपासून 50 ते 60 कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न प्राप्त होण्याचा अंदाज आहे. 

◆ चंदनाचे झाड 10 ते 12 वर्षात पूर्ण तयार होते आणि सध्याच्या मोलभावाप्रमाणे चंदनाचे एक झाड 10 लक्ष ते 12 लक्ष रुपयांना विकले जाते.
त्याचप्रमाणे, अगरबत्तीच्या काड्या बनविण्यासाठी वापरला जाणारा बांबूचा एक विशेष प्रकार ‘बांबुसा तुलदा’ हा आसाममधून आणण्यात आला असून, स्थानिक अगरबत्ती उद्योगाला चालना मिळावी आणि प्रशिक्षण केंद्राला नियमित उत्पन्न मिळावे या उद्देशाने महाराष्ट्रात या बांबूची लागवड करण्यात आली आहे. 

◆ तिसऱ्या वर्षापासून बांबूपासून उत्पन्न मिळायला सुरुवात होते. प्रत्येक बांबूला तीन वर्षानंतर किमान 5 पेरे तयार होतात आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी बांबू पेराचे उत्पादन दुप्पट होते. म्हणजेच, 500 बांबूच्या रोपांपासून तिसऱ्या वर्षी किमान 2500 बांबू पेरे मिळतील आणि संस्थेला जवळपास 3.25 लक्ष रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न प्राप्त होणार आणि ज्यात प्रत्येक वर्षी अंदाजे दुप्पट वाढ होणार.

◆ गेल्या काही महिन्यांत KVICने भारताच्या विविध भागात बांबूसा तुलदा जातीच्या बांबूच्या सुमारे 2500 रोपांची लागवड केली आहे. अगरबत्ती उत्पादकांना किफायतशीर दराने कच्च्या मालाची स्थानिक उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी नाशिकमध्ये नुकतीच केलेली बांबूची लागवड वगळता दिल्ली, वाराणसी आणि कन्नौज या शहरांमध्ये बांबूसा तुलदा जातीच्या बांबूच्या 500 रोपांची लागवड करण्यात आली आहे.

◆ निर्यात बाजारपेठेत चंदन वृक्ष लागवडीला खूप मोठी मागणी आहे. चीन, जापान, तैवान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यासारख्या देशांमध्ये चंदन व त्याच्या तेलाला मोठी मागणी आहे. 

◆ त्यात, चंदनाचा पुरवठा खूपच कमी प्रमाणात आहे आणि म्हणूनच चंदनाची लागवड वाढविण्यासाठी आणि चंदन उत्पादनात जागतिक स्थान मिळविण्याची मोठी संधी भारताला आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा