सोमवार, ५ मार्च, २०१८


📌 ASO/STI/PSI - 2018 पूर्वची तयारी 

✅सपर्धा परीक्षांना सामोरे जाताना...

▶️ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब संयुक्त पूर्व परीक्षा वरील तिन्ही पदांसाठी एकूण 449 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

▶️ यांची पूर्व परीक्षा 13 मे 2018 रोजी घेण्यात येणार असून ऑनलाईन अर्ज करावयाची मुदत 20 मार्च 2018 पर्यंत आहे.

▶️ सहायक कक्ष अधिकारी गट - ब एकूण पदे 28, राज्य कर निरीक्षक - गट ब - पदे - 34, पोलिस उपनिरीक्षक गट - ब - 387 पदे.

✅ शक्षणिक पात्रता :

▶️ मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य अर्हता पदवीच्या शेवटच्या वर्षास असलेला उमेदवार अर्ज करू शकतो.

▶️ वतन - रुपये 9300 ते 34,800 (ग्रेड पे - 4,300) अधिक नियमानुसार भत्ते.

▶️वयोमर्यादा - ASO व STI साठी  सर्वसाधारण गटासाठी  18 ते 38, मागासवर्गीय - 43 वर्षे, PSI - साठी  सर्वसाधारण 19 ते 31, मागासवर्गीय - 34.

▶️ महत्त्वाचे :- या परीक्षेचा मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक 1 हा सामाईक राहील. हा पेपर 26 ऑगस्ट 2018 रोजी घेण्यात येईल.

▶️ पपर नंबर 2 हा पेपर - PSI - साठी 2 सप्टेंबर 2018 रोजी, STI  - साठी - 30 सप्टेंबर 2018 व ASO - साठी 6 ऑक्टोबर 2018 रोजी घेण्यात येईल.

▶️ महिलांसाठी आरक्षित पदाकरिता दावा करणार्‍या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी व नॉन मिलेअरमध्ये मोडत असल्याबद्दल (SC व ST) वगळून स्पष्टपणे नमूद करावे.

▶️ परीक्षेस येतेवेळी स्वत:च्या ओळखीच्या पुराव्यासाठी कोणतीही दोन मूळ  ओळखपत्रे व त्याच्या छायांकित प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.

▶️ तम्ही कोणत्या पदासाठी  इच्छुक आहात हे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक.

▶️ PSI पदासाठी शारीरिक क्षमता चाचणी असते,  पुरुष उंची - 165 सेे. मी., महिला 157 सें. मी.  आवश्यक असते.

▶️ परीक्षा शुल्क पूर्व : अमागास - 374 तर मागासवर्गीय 274.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा